ॐ गणेशाय नमः
श्री संत भिकाराम महाराज
परिचयात्मक
मनाने ध्यास हा धरीला जाऊ आष्टयास बघण्याला,
औलीया संत नांदत से भिकाजी म्हणती जन त्याला
वर्धा नदीच्या काठी वसलेल्या अष्टा ( वडाळा) या छोट्याश्या गावी एक गरीब कुटुंबात २९ जनेवरी १९५४ रोजी श्री संत भिकाराम महाराजांचा जन्म झाला।
भिकाराम महाराज यांचा जन्म एक साधारण बाळ सारखं झाल होत। भिकाराम महाराज यांच मूड नाव नारायण आणि त्यांचे वडील गोपाळराव व आई यशोदा। साधारणतः वायाचे २० ते २२ व्या वर्षी त्यांचे डोक्यात वेडेपण शिरले। त्यामुळे ते जंगलों जंगली उघड्या अवस्थेत फिरायचे कोणावरही मारायला धावायचे। त्यामुळे घरादारात व गावकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते। विशेषतः आया बायांमध्ये फारच भिंतीचे वातावरण पसरले होते। त्यांचा वर बरेच उपचार करण्यात आले। परंतु काही एक सुधार झाला नाही। त्यामुळे गावकर्यांनी झोपी मध्ये असतांना त्यांच्या हाथा पायात बेड्या टाकल्या।
गावातून निघालेले सांडपाण्याच्या नालीचे गोठाणावर थाळगे साचले होते त्यातील ते पाणी प्यायचे।
परंतु नदी वर आंघोळ व पाणी प्यायला जातांना कोणी पाहीले नाही। अशा प्रकारे त्यांची दिनचर्या, उदरनिर्वाह चालायचा। गावातील कोणाच्याही दारावर ते भिक मांगायला गेले नाहीत।
काही दिवसानंतर त्यांचे स्वभावात शांतता आली। अनेक लोकांना त्यांचा अनुभव यायला लागला। त्यांची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती। त्यामुळे गावकर्यांनी त्यांच्या हातापायातील बेड्या काढल्या तब्बल १२ वर्षा नंतर बेड्या काढण्यात आल्या। आज बेड्या काढून १५ ते १६ वर्ष होत आहे। अजुनही त्यांनी पाठी मागचे गाव पाहिले नाही। स्नान केले नाही। दात घासले नाहीत। जेवनाचे हात सुध्दा धूतले नाहीत। पूर्णपणे त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली आहे।
दहा वर्षापासून गावकरी २२ जाने. ते २९ जाने। या काळात दरवर्षी जन्म उत्सव साजरा करतात। २९ जानेवारीला भव्य महाप्रसाद असते। सन २००५ मध्ये वीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।
दहा वर्षापासून गावकरी २२ जाने. ते २९ जाने। या काळात दरवर्षी जन्म उत्सव साजरा करतात। २९ जानेवारीला भव्य महाप्रसाद असते। सन २००५ मध्ये वीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।
पूर्णपणे निर्मळ वैराग्य अवस्था बाबांचे ठिकाणी प्राप्त झाली। त्यामुळे बाबाचे बोलतील ते अमृत वचन आहे। आतापर्यंत अनेकांच्या पारंपरिक अडचणी बाबांनी सोडवल्या आहेत। दररोज १००० ते १५०० भाविक दर्शनास येत आहेत।
दिवसे दिवसेंदिवस बाबांचे प्रस्थ वाढतच आहेत।
Comments
Post a Comment